कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

मेथी मटर मलई

मेथी मटर मलई:

साहित्य: एक जुडी मेथी, एक कप मटार, अर्धा कप साय,  4 मध्यम कांदे,  दही  अर्धा कप ,लसूण पाकळ्या,  अर्धा टीस्पून आलं पेस्ट, एक टीस्पून लाल तिखट, मीठ, एक टीस्पून गरम मसाला, दहा बारा काजू, तेल दोन टेबलस्पून, एक टीस्पून साखर, एक कप पाणी
कृती: मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. मटार थोडे पाणी घालून शिजवून घ्यावेत. कांदे सोलून चार भाग करावेत. लसूण सोलून घ्यावी. कांदा आणि लसूण थोडे पाणी घालून वाफवून घ्यावे. कढईत एक टेबलस्पून तेल तापवावे. त्यात काजू तळून बाजूला ठेवावेत. आता त्यात चिरलेली मेथी घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावी. बाजूला काढून ठेवावी. काजूगर आधी बारीक करावेत मग त्यात कांदे, लसूण गार झाल्यावर आणि आलं  घालून पेस्ट करून घ्यावी. कढईत एक टेबलस्पून तेल तापवावे. त्यात कांद्याचे वाटप घालावे, दोन मिनिटं परतून त्यात साय,  दही,गरम मसाला, लाल तिखट घालून तेल सुटेपर्यंत परतावे. आता त्यात परतलेली मेथी,  शिजलेले मटार, एक कप पाणी घालावे. चवीनुसार मीठ आणि साखर घालावी. नीट मिक्स करून उकळी आणावी. चव बघून काही लागल्यास वाढवावे.
✍🏻मीनल सरदेशपांडे