कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २८ जुलै, २०२०

अडई डोसा

अडई डोसा:
साहित्य:
दीड वाटी तांदूळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी चणाडाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, मेथी दाणे अर्धा टीस्पून, आलं पेस्ट एक टीस्पून, तीन ओल्या मिरच्या, चार सुक्या मिरच्या, मूठभर कढीलिंब पाने, मीठ, तेल

कृती:
तिन्ही डाळी, तांदूळ, मेथी चार वेळा धुवून  घ्यावे. त्यात सुक्या मिरच्या घालून चार तास भिजत घालावे.  चार तासांनी सर्व बारीक वाटून घ्यावे, वाटताना त्यात कढीलिंब पाने, आलं पेस्ट आणि ओल्या मिरच्या घालावे. सर्व मिश्रण डोश्याच्या पिठाईतपत असावे.
पिठात मीठ घालावे. तवा तापत ठेवावा. तापल्यावर गॅस बारीक करून त्यावर तेल नीट लावावे. त्यावर पळीने मिश्रण घालून गोलाकार पातळ पसरावे.
झाकण ठेवून एक बाजूने भाजावा. झाकण काढून दुसरी बाजू भाजून घ्यावी, दुसरी बाजू भाजताना बाजूने तेल सोडावे मस्त कुरकुरीत होतो.
चटणी बरोबर सर्व्ह करावा.
टीप: या डोश्याचे पीठ आंबवावे लागत नाही.
अगदी पेपर डोश्या इतका हा पातळ नसतो.
मी रात्री भिजत घालून सकाळी वाटून डोसे केले.
✍🏻 मीनल सरदेशपांडे