लाल भोपळा चिरून - अर्धा किलो ( साले काढुन) सालासहीत पण घेतात.
सुके खोबरे - पाव वाटी
खसखस - पाव वाटी
तेल - अर्धी वाटी
कढीपत्ता - १०-१२ पानं
चिंचेचा कोळ - २-३ टेबलस्पून
गूळ - २-३ टेबलस्पून
हळद - अर्धा टीस्पून
तिखट- दीड टीस्पून
आलं किसून - 1 टेबलस्पून
गरम मसाला 1 टीस्पून
लसूण - ५-६ पाकळ्या (ऑप्शनल) मी घालत नाही.
मीठ - चवीनुसार
कोथिंबीर
कृती
खोबरं आणि खसखस वेगवेगळं भाजून घ्या आणि नंतर कोरडंच एकत्र वाटा.
पाव वाटी तेल गरम करा. तेल तापले की मोहरी, हिंग, कढीपत्ता घाला, आलं किसून यातच घाला, (लसूण खात असाल तर आल्या सोबत वाटून घाला) म्हणजे स्वाद जास्त छान येतो. आता यात वाटलेले खोबरं खसखस घाला. भरपूर परता. तेल सुटायला लागले की मग हळद, तिखट घाला. मसाला घाला. लाल भोपळ्याच्या फोडी घाला, पाणी घाला. भाजी शिजत आली की मीठ घाला, चिंच गुळ घालून उकळा यातला भोपळा शिजला पाहिजे पण गाळ नको पाच मिनिटांत शिजतो. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
उरलेल्या तेलाची सुक्या मिरच्या, हिंग आणि पाव टीस्पून लाल तिखट घालून फोडणी करा. ही या भाजीला द्या.