कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

नवलकोलचे लोणचे:

नवलकोलचे लोणचे:
साहित्य: दोन वाट्या नवलकोल च्या फोडी, दोन टीस्पून लाल तिखट, तीन टीस्पून लाल मोहोरी, अर्धा टीस्पून मेथी दाणे, एक लिंबू, मीठ दीड टीस्पून, हिंग अर्धा टीस्पून तेल दोन टेबलस्पून, हळद अर्धा टीस्पून फोडणीसाठी: मोहोरी पाव चमचा, हिंग पावडर पाव चमचा, हळद अर्धा चमचा, तिखट चिमूटभर

कृती:
१)नवलकोल चे कांदे धुवून सोलून घ्या.
२)आवडीप्रमाणे फोडी करून घ्या.
३) फोडींना मीठ, हळद लावून घ्या.
४) दोन टेबलस्पून मोहोरी मिक्सरला फिरवून घ्या.
५) कढईत तेल तापवा, त्यात मेथी दाणे तळून घ्या.
६) मोहोरी, हिंग, हळद आणि चिमूटभर तिखट घालून फोडणी करा.
७) लिंबाचा रस काढून फोडींमध्ये मिसळा.
८) मोहोरी पावडर, लाल तिखट फोडींमध्ये मिक्स करा.
९) गार करून फोडणी घाला.
१०)एक दिवस मुरलं की खायला तयार... पण खाताना जरा जपून.. मोहोरी नाकात कळते!
✍🏻 मिनल सरदेशपांडे

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

एगलेस कस्टर्ड पुडिंग:

 एगलेस कस्टर्ड पुडिंग:
साहित्य: एक कप दूध, एक कप मिल्कमेड, एक कप दही, एक टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर, पाव कप साखर, पाणी
( एक कप: 250ml)
कृती: मिल्कमेड तयार वापरू शकता, मी घरी केलं. 
१)अर्धा ली दूध, 200 ग्रॅम साखर, आणि 10 रु वाली दूध पावडरची दोन पॅकेट्स एकत्र करून एक कप होईल असं आटवा.
२) गार करत ठेवा.
३) सॉस पॅन मध्ये साखर अगदी थोडं पाणी घालून गॅसवर ठेवा.
४)भांडं हलवून हलवून वितळवून घ्या. गोल्डन कलर आला की ज्यात पुडिंग करायचं त्या भांड्यात ओता.
५) गार झालेलं मिल्कमेड, दही, दूध आणि कस्टर्ड पावडर एकत्र करून ब्लेंड करा.
६) कॅरॅमल सेट केलेल्या भांड्यात तयार मिश्रण ओता.
७) कुकरमध्ये खाली जाळी ठेवून पाणी घाला.
८) त्यावर हे भांडं ठेवून झाकण ठेवा.
९) शिट्टी न लावता 20 मिनिटं वाफवा.

१०) बाहेर काढून थोडं गार झालं की तीन तास फ्रिजमध्ये ठेवा.
११) एखादया प्लेटमध्ये भांडं उपडं करा.
१२) गारेगार सर्व्ह करा.

✍🏻मिनल सरदेशपांडे

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

हनी रोस्टेड अलमन्ड्स:

हनी रोस्टेड अलमन्ड्स:
मैत्रीण हनी रोस्टेड ड्रायफ्रूटस् घेऊन आली. ते इतके आवडले सगळ्यांना की मला शोधकार्य करावेच लागले!  मी घरातल्या वस्तू वापरून करून पाहिली.

साहित्य: एक कप बदाम, दीड टेबलस्पून मध, दीड टेबलस्पून पाणी, एक टीस्पून तेल(मी रिफाईंड शेंगदाणे तेल वापरले), एक टेबलस्पून पिठी साखर, पाव टीस्पून मीठ
कृती: बदाम मंद गॅसवर कढईत भाजून घ्या. बाजूला ठेवा. पसरट कढईत मध,पाणी आणि तेल एकत्र करून उकळायला ठेवा. एका पसरट भांड्यात पिठीसाखर आणि मीठ एकत्र करून बाजुला ठेवा. उकळी आली की त्यात भाजलेले बदाम घालून सगळं मधाचं मिश्रण आळेपर्यंत मंद गॅसवर परतत रहा.
आता परतलेले बदाम पिठीसाखर आणि मिठात घोळवा. गार झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवा.
अशाच पध्द्तीने तुम्ही मिक्स ड्रायफ्रूट पण करू शकता.
✍🏻मिनल सरदेशपांडे