कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ५ मार्च, २०२०

डाळिंब्यांची किंवा बिरड्याची आमटी:

डाळिंब्यांची किंवा बिरड्याची आमटी:
साहित्य: एक कप डाळींब्या, अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस, एक टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून लाल तिखट, दोन तीन सुक्या मिरच्या, मोहोरी पाव टीस्पून, कढीलिंबाची पानं चार पाच, आमसुलं चार, गूळ दोन टीस्पून, तेल एक टेबलस्पून, मीठ, अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, दोन कप पाणी
कृती: कडवे सकाळी कोमट पाण्यात भिजत घालावेत. रात्री पाण्यातून काढून बांधून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी छान मोड आले की गरम पाण्यात थोडा वेळ ठेवून सालं काढावीत. सोललेल्या डाळिंब्या पाणी थोडी हळद आणि हिंग घालून मोडणार नाहीत अशा वाफवून घ्याव्यात. खोबरं आणि जिरं वेगवेगळं भाजून थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. कढईत तेल तापत ठेवावे. तेल तापले की मोहोरी घालावी. ती तडतडतली की सुक्या मिरच्यांचे तुकडे, हिंग, हळद आणि थोडे लाल तिखट घालून शिजलेल्या डाळिंब्या घालाव्यात. आता त्यात दोन कप पाणी, वाटप, कढीलिंबाची पानं, आमसुलं, गूळ, मीठ घालून उकळी आणावी, उरलेलं लाल तिखट घालावे. चवीनुसार लागेल ते वाढवावे. मस्त चविष्ट आमटी तयार आहे!
✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा