कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

सोपी झटपट आंबा काजू बर्फी

 सोपी झटपट आंबा काजू बर्फी:

साहित्य: एक वाटी  आटवलेला आमरस, एक वाटी काजू पावडर, सव्वा वाटी साखर, अर्धी वाटी पाणी, वेलची पावडर

कृती: साखरेत पाणी घालून पाक करत ठेवा. एका वाटीत अर्धी वाटी पाणी घ्या. पाक चांगला उकळला भरपूर बुडबुडे यायला लागले की वाटीतल्या पाण्यात पाकाचा थेंब टाकून गोळी होतेय का पहा. गोळी झाली की आपला पाक तयार झाला. गॅस बंद करा आता त्यात काजू पावडर आणि आटवलेला आमरस मिसळा. वेलची पूड घाला. घोटत रहा.

ताटाला तूप लावून घ्या. घट्ट गोळा झाला की ताटावर थापून वड्या पाडा.

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

आंबा काजू कमळफुल

 आंबा काजू कमळफुल: 

आटवलेला आमरस एक वाटी, साखर एक वाटी

काजूगर दोन वाटी, साखर एक वाटी,

दोन्हीसाठी वेलची पावडर आणि पाणी

कृती: १) काजूगर थोडे थोडे  घेऊन मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतली. ती बाजूला ठेवली.

२) आमरस एक वाटी मोजून घेतला.

३) कढईत एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेऊन पाक करायला ठेवलं, त्यात पाव चमचा वेलची पावडर घालून गोळीबंद पाक केला.

४) गॅस बंद करून आटवलेला आमरस मिक्स केला.

५) खाली उतरून घोटलं, आणि त्याचे छोटे गोळे करून घेतले.

६) दुसऱ्या कढईत एक वाटी साखर, अर्धी वाटी पाणी घालून पाक करायला ठेवलं, वेलची पावडर घातली. साखर विरघळल्यावर त्यात काजू पावडर मिक्स केली. 

७) दोन मिनिटं गॅसवर ठेवून कढ काढला आणि गॅस बंद करून मिश्रण घट्ट होईपर्यंत खाली उतरून घोटलं.

८) गोळा झाल्यावर जेवढे गोळे आंब्याचे झालेत तेवढे गोळे काजूचे केले.

9) प्रत्येक गोळ्याची वाटी करून त्यात आंब्याचा गोळा ठेवला आणि बंद केलं.

१०) सगळे गोळे असे करून घेतले.

११) आता रीळाच्या दोऱ्याने चार भाग अलगद कापले.

१२) कमळफुल तयार!