कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १५ मे, २०१८

चॉकलेट शंकरपाळे

चॉकलेट शंकरपाळे

 

 साहित्य

  • एक वाटी दूध
  • एक वाटी साखर
  • एक वाटी तूप
  • तीन टेबलस्पून कोको पावडर
  • मीठ पाव टीस्पून
  • तळणीसाठी तेल
  • साडेचार वाट्या मैदा
  •  
  • मैदा आणि कोको पावडर एकत्र करून चाळून घ्या.
  • दूध आणि साखर एकत्र करून गरम करा, साखर विरघळू द्या.
  • दूध गार करत ठेवा.
  • एका कढईत तूप तापवा.
  • चाळलेल्या मैद्यात मीठ घाला आणि तुपाचे मोहन घाला.
  • नीट मिक्स करा.
  • थोडं गार होऊ द्या.
  • गार झालेले दूध साखर मिश्रण घेऊन मैदा घट्ट मळा.
  • गरज लागली तर थोडा सुका मैदा घ्या.
  • तासभर झाकून ठेवा.
  • छोटे गोळे करून सर्व शंकर पाळे लाटून, कातून घ्या.
  •  
  • आता सोडवून एका गोळ्याचे एका ठिकाणी असे गठ्ठे करा.
  • कढईत तेल घ्या. अंदाजे पाच वाट्या लागेल.
  • तापले की एकेक गठ्ठा तेलात सोडा.

    1. आत गेल्यावर ते आपोआप मोकळे होतात.
     मध्यम आचेवर तळा.
  • कोको पावडर मुळे रंग बदललेला पटकन कळत नाही
  • गार झाले की चहा बरोबर सर्व्ह करा.

चोको चिप्स

चोको चिप्स बनवण्यासाठी साहित्य

  • डार्क चॉकलेट बार 200 ग्रॅम
  • एक टीस्पून लोणी किंवा बटर
  • पायपिंग बॅग
  • बटर पेपर
  • चोको चिप्स 

  • डार्क चॉकलेट बारचे तुकडे करा.
  • एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा.
  • त्यावर बाऊल ठेवून त्यात डार्क चॉकलेटचे तुकडे ठेवा.
  • त्यात लोणी घाला.
  • ढवळत रहा.
  • सगळं चॉकलेट वितळते.
  • एका ग्लास मध्ये पायपिंग बॅग ठेवा.
  • त्यात पातळ झालेलं चॉकलेट भरा.
  • बटर पेपरला तूप लावा.
  • पायपिंग बॅगचे बारीक टोक कापा.
  • अंतर ठेवून चिप्स च्या आकारात थेंब टाका.
  • पंधरा मिनीटं सेट होऊ द्या.
  • तयार चिप्स काढून एकत्र करा.
  • तुमच्या आवडीच्या डिश सजवायला, अजून छान फ्लेवर यायला वापरा.
  •  

रायआवळ्याचं टिकाऊ सरबत


साहित्य: साखर, मीठ, राय आवळे
कृती: आवळे पाणी न घालता मिक्सरला हळूहळू फिरवा म्हणजे बिया क्रश होणार नाहीत. ज्यूस गाळून घ्या. एक वाटी ज्यूस असेल तर दोन वाट्या साखर घ्या. एका पातेल्यात साखर बुडेल एवढे पाणी घालून उकळत ठेवा. गोळीबंद पाक करायचा आहे. एका वाटीत अर्धी वाटी पाणी घ्या. त्यात पाक टाकून पहा. जर मऊ गोळी झाली तर गॅस बंद करा आणि त्यात ज्यूस आणि चवीला मीठ मिसळा. गार झाले की बरणीत भरा. करायच्या वेळी चौपट पाणी आणि वेलची पावडर घालून ढवळा आणि गारेगार सर्व्ह करा.