चॉकलेट शंकरपाळे
साहित्य
- एक वाटी दूध
- एक वाटी साखर
- एक वाटी तूप
- तीन टेबलस्पून कोको पावडर
- मीठ पाव टीस्पून
- तळणीसाठी तेल
- साडेचार वाट्या मैदा
- मैदा आणि कोको पावडर एकत्र करून चाळून घ्या.
- दूध आणि साखर एकत्र करून गरम करा, साखर विरघळू द्या.
- दूध गार करत ठेवा.
- एका कढईत तूप तापवा.
- चाळलेल्या मैद्यात मीठ घाला आणि तुपाचे मोहन घाला.
- नीट मिक्स करा.
- थोडं गार होऊ द्या.
- गार झालेले दूध साखर मिश्रण घेऊन मैदा घट्ट मळा.
- गरज लागली तर थोडा सुका मैदा घ्या.
- तासभर झाकून ठेवा.
- छोटे गोळे करून सर्व शंकर पाळे लाटून, कातून घ्या.
-
- आता सोडवून एका गोळ्याचे एका ठिकाणी असे गठ्ठे करा.
- कढईत तेल घ्या. अंदाजे पाच वाट्या लागेल.
- तापले की एकेक गठ्ठा तेलात सोडा.
- आत गेल्यावर ते आपोआप मोकळे होतात.
- कोको पावडर मुळे रंग बदललेला पटकन कळत नाही
- गार झाले की चहा बरोबर सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा