नारळाच्या दुधातील खरवस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KHARVAS Recipe in Marathi )
- पहिल्या दिवसाचा चीक एक वाटी
- नारळाचं दूध सव्वा वाटी
- गूळ पाऊण वाटी
- जायफळ पावडर पाव टीस्पून
- केशर काड्या
- न वाट्या ओलं खोबरं मिक्सरला पाणी घालून फिरवा
- गाळण्याने दूध गाळून घ्या.
- एक वाटी चिकात सव्वा वाटी दूध मिसळा.
- गूळ बारीक चिरून घ्या.
- आधी अर्धी वाटी मिसळून चव बघा.
- गोड पुढे लागेल असा गूळ हवा.
- लागला तर अजून घाला.
- एका डब्यात मिश्रण ओता.
- जायफळ पावडर केशर काड्या घाला.
- कुकरमध्ये खाली पाणी घालून प्लेट ठेवा.
- डबा झाकण लावून ठेवा.
- शिट्टी काढून 15 मिनिटं वाफवा.
- गार किंवा गरम सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा