कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

रवा बेसन लाडू

साहित्य: दीड वाटी बेसन, दीड वाटी रवा, सव्वा दोन वाट्या साखर, अर्धी वाटी तूप, बेदाणे, पाणी, वेलची पावडर
कृती: रवा कोरडा भाजून घ्यावा. तूप घालून बेसन भाजावे. तांबूस होऊ लागले की रवा मिक्स करून थोडे भाजावे. बाजूला ठेवावे. पातेल्यात साखर घेऊन ती बुडेल इतके पाणी घालावे. एक तारी पेक्षा थोडा जास्त पाक करावा. पाकात भाजलेले रवाबेसन, वेलची पावडर घालून नीट मिक्स करावे. झाकून ठेवावे. अधून मधून ढवळावे. तासाभरात मिश्रण लाडू वळण्याइतपत होते. बेदाणे लावून लाडू वळावेत.

बुधवार, २५ एप्रिल, २०१८

चॉकलेट शिरा:

चॉकलेट शिरा:

मुलांच्या सुट्ट्यांमध्ये सतत काहीतरी खायला दे असं चालू असतं! रोज नवीन काय करणार हा प्रश्नच असतो. मग आहे तीच डीश त्यांच्या आवडीच्या फ्लेवरने सजवली की खुश होतात.

साहित्य: एक वाटी रवा, दोन वाट्या दूध, एक वाटी पाणी, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी तूप, तीन टीस्पून कोको पावडर, चोकॉचिप्स, बदाम काप सजावटीसाठी, वेलची पावडर अर्धा टीस्पून, मीठ चवीला

कृती:
 रवा तूप घालून छान तांबूस भाजून घ्यावा. दूध आणि पाणी एकत्र करून गरम करावे. त्यात कोको पावडर मिक्स करून घ्यावी. भाजलेल्या रव्यात चिमुटभर मीठ, साखर आणि कोको पावडर मिक्स केलेले दूध पाणी घालून ढवळावे. मंद गॅसवर शिजू द्यावे. पाच मिनिटांनी बदाम काप मिक्स करावे. वेलची पावडर घालावी.
खायला देताना गरम शिऱ्यात चोकॉचिप्स मिक्स करून द्यावे. गरम शिऱ्या मुळे चोकॉचिप्स विरघळून मधेच खाताना चॉकलेट लागतं! मुलं खुश होतातच.. बघा करून!

reakfast specially for kids: Chocolate sheera:

Breakfast specially for kids:
Chocolate sheera:


  • Ingredients:
  • Semolina 1 cup, 
  • Milk 2 cups, 
  • Sugar 1/3 cup, 
  • Water 1 cup,
  • Ghee 1/2 cup, 
  • Salt to taste, 
  • Cardamom powder 1/2 teaspoon, 
  • Cocoa powder 4 teaspoons, 
  • Choco chips , 
  • Almond pieces for garnishing
  • Procedure:
  • Add ghee and semolina in a large pan. 
  • Roast semolina till golden brown on medium flame. 
  • Add milk, water and cocoa powder in a big bowl. 
  • Mix well. 
  • Boil the mixture. 
  • Add all milk mixture slowly in roasted semolina. 
  • Add sugar and salt to taste.
  • Keep stirring on law flame.
  • Keep lid for five minutes. 
  • Add cardamom powder. 
  • Garnish with choco chips and almond pieces. 
  • Enjoy fusion recipe!!
 

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

उकड गऱ्याची भाजी:

उकड गऱ्याची भाजी:
या सिझनला उकड गऱ्यांची भाजी बरेचदा होते. घरातल्या सगळ्या मंडळींना कामाला लावून आदल्यादिवशी तयारी करून ठेवावी लागते. यासाठी फणस पण चांगल्या जाड गऱ्यांचा उतरवून काढावा लागतो. फणस पडलेला असेल तर भाजीचे गरे कडू होऊ शकतात.

विळीला तेल लावून घ्यावे. फणसाचे चार भाग करून कागदाने सगळा चीक पुसून घ्यावा. मधला जाड दांडा म्हणजे पाव आणि वरची काटे असलेली साल हणजे चारखंड काढून गऱ्यांच्या शेडी सुपात कागदावर ठेवाव्यात. आता घरातील सर्व भाजी प्रेमी मंडळींना कामाला लावावे. गऱ्यांवर असलेल्या पात्या किंवा सांगूळ काढून गरे साफ करावेत. गऱ्याचे दोन भाग करून आतील बी म्हणजे आठीळा काढाव्यात. त्यावरचे मऊ आवरण काढून त्या एका डब्यात एकत्र कराव्यात. गऱ्याचे चार किंवा सहा तुकडे करावेत.

 आता बाजूला ठेवलेल्या आठीळा थोड्या ठेचाव्यात किंवा विळीवर तुकडे करावेत. त्यावर असलेले कडक आवरण काळजीपूर्वक काढावे. एखादं जरी राहिलं तरी खाताना त्रास होतो.

ही झाली पूर्व तयारी!!
आता एक पातेल्यात पाणी गरम करावे. त्यावर राहील अशी चाळण घेऊन त्यात गरे ठेवावेत आणि वर झाकण ठेवून छान वाफ काढावी. गरे किती आहेत त्यावर वेळ अवलंबून! तोपर्यंत आठीळा पाणी मीठ आणि हळद घालून कुकरला शिजवून घ्याव्यात. दहा मिनीटांनी गरे शिजलेत का पहावे. गार करायला ठेवावेत. कढईत एक वाटी तेल तापवावे. उगाच वाटीभर तेल वाचून दचकू नका. ही भाजी अशीच करायची असते. तेल तापलं की त्यात दहा बारा सांडगी मिरच्या तळून घ्याव्यात. एक चमचा मेथी, पाच सहा सुक्या मिरच्या, मोहोरी, एक चमचा हिंग हळद आणि लाल तिखट अशी फोडणी करावी. त्यात वाफवलेले गरे घालून परतावेत. त्यात मीठ, गूळ घालावा. तळलेल्या सांडगी मिरच्याची पावडर करून घ्यावी. त्यातली एक चमचा भाजीत घालावी. आता शिजलेल्या आठीळा घालून नीट ढवळावी. पाच मिनिटं वाफ येऊ द्यावी. परत अर्धी वाटी तेलाची फोडणी करून एक भांड्यात काढून ठेवावी. खाताना भाजीवर सांडगी मिरची, तेलाची फोडणी घेऊन नुसती किंवा पोळी भाकरी बरोबर खावी.
मला तर ही भाजी नुसतीच आवडते फक्त वर ताजे ओलं खोबरं घातलं की नाश्त्याला मस्त डिश तयार!!
आता मे महिन्यात एकदाच येणाऱ्या या पाहुण्याचं स्वागत करताना उगाच तेल किती ... असे अभद्र विचार आणू नयेत... पाहुणे रागवायचे!
टीप: फणसाचे गरे मोजून त्यात घालायच्या वस्तू टीस्पून मध्ये बसवणं अवघड आहे... माझं प्रमाण पंधरा माणसांसाठी आहे.

Aamrakhand( आम्रखंड):

Aamrakhand( आम्रखंड):

साहित्य: 1 ली दही, दोन कप साखर, तीन कप आमरस, आंब्याच्या फोडी सजावटीला, वेलची पावडर, मीठ चवीला
कृती: दही 8 तास कापडात बांधून टांगून ठेवावे. सगळे पाणी जाऊ द्यावे. चक्का बाऊलमध्ये घ्यावा. साखर आणि आमरस घालून ढवळावे. पुरण यंत्रातून काढावे. मीठ चवीला आणि वेलची पावडर मिसळावी. आंब्याच्या फोडींनी सजवून पुरी बरोबर सर्व्ह करावे.
Ingredients:
 1li. curd, 2 cup sugar, 3 cup mango pulp , mango pics. for garnishing, cardamom powder, salt to taste

Procedure:
Hang curd for 8 hours in a cloth. Keep till all the water content drips out. Take chakka in a bowl. Add sugar and mango pulp salt to taste. Mix well. Churn through puran jali or machine. Add cardamom powder, and some mango pics. Garnish with mango pics. Serve chilled Aamrakhand with puri.

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

आंबा लोणचे

साहित्य:तीन कैऱ्या, मसाल्यासाठी लाल मोहोरी अर्धी वाटी, एक चमचा मेथी, चार चमचे लाल तिखट, मीठ. फोडणीला पाव वाटी तेल, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट.
कृती:  मोहोरी पावडर करा. मेथी तळून घेऊन पावडर करून घ्या. कैऱ्या स्वच्छ धुवून फोडी करून तिखट, मीठ, मोहोरी मेथी पावडर आणि गार करून फोडणी घाला. फोडणीत लाल तिखट घातले की रंग छान येतो!

मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

आंबा मोदक

Modak is Lord Ganesha's most favorite food. One more konkani sweet dish with mango.. Mango Modak:
Ingredients: 2 bowls rice flour, 2 1/2 bowls mango pulp, half bowl sugar, 11/2 bowl water, half tsp salt, 1tsp cardamom powder, 2 bowls grated coconut, 2 tsp unsalted butter
Procedure: For stuffing: 1)Take 2 bowls grated coconut, 2 bowls mango pulp, half bowl sugar in a large pan.
2) Put it on a low flame.
3) Stir it continuously till the mixture becomes thick, add cardamom powder.
4)Turn off the flame.
5) Allow it to cool.

6)To Make the outer covering boil 1 1/2 bowls water and half bowl mango pulp.
 7)Add 2 tsp unsalted butter and half tsp salt to taste.
8)Once the water starts boiling add rice flour, Stir well.
9) Keep it covered for five minutes on low flame.
10) Knead the dough when its warm.
11) Use little oil and cool water if necessary to make a soft dough.
12)Keep the dough covered.
13)Make a small ball of the dough.
14)Spread it evenly with hands and make a bowl. Hold it in your left hand, add two tsps stuffing.

15) pleat the edges of the dough and gather them together. Pinch to seal at the top.
16) Heat sufficient water in the steamer.
17) place banana leaves in a plate.
18) Place modak over banana leaves, cover properly
19) Steam for 15 minutes.
20) Serve with desi ghee.

गणपती बाप्पाचा एकदम आवडता पदार्थ मोदक! घेऊन आलेय आंबा मोदक स्पेशल कोकणी डीश:

साहित्य: २ वाट्या तांदूळ पिठी, दीड वाटी पाणी, दोन चमचे लोणी, अर्धा चमचा मीठ, अडीच वाट्या आमरस, दोन वाट्या खवलेला नारळ, अर्धी वाटी साखर, एक टीस्पून वेलची पावडर
कृती: सारणासाठी: 1)दोन वाट्या ओलं खोबरं, दोन वाट्या आमरस, अर्धी वाटी साखर एका कढईत एकत्र करा.
2)मंद गॅसवर ठेवा.
3) गोळा होईपर्यंत सतत ढवळत रहा.
4) गॅस बंद करा.
5) सारण गार होऊ द्या.
6)मोदकाच्या बाहेरच्या आवरणासाठी एक पातेल्यात दीड वाट्या पाणी, अर्धी वाटी आमरस एकत्र करून उकळत ठेवा.
7) त्यात मीठ आणि लोणी मिक्स करा.
8)पाणी उकळू लागले की तांदूळ पिठी मिक्स करून नीट ढवळा.
9)पाच मिनिटं मंद गॅसवर वाफ येऊ द्या.
10) गरम असतानाच उकड मळायला घ्या.
11)गरजेनुसार थोडं तेल आणि गार पाणी वापरा.
12)मळलेली उकड झाकून ठेवा.
13)उकडीचा एक लहान गोळा घ्या.
14)हाताने वळत गोळ्याला छान वाटीचा आकार द्या.
15)वाटीत दोन चमचे सारण भरा. कडेला छान चुण्या पाडा. एकत्र करून मोदक वळून घ्या.
16) मोदक पात्रात पाणी गरम करत ठेवा.
17) चाळणीत केळीची पानं ठेवा.
18)त्यावर मोदक ठेवून झाकण लावा.
19) 15 मिनीटं वाफवा.
20)तयार मोदक साजूक तुपाबरोबर वाढा.