कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

शाही मुरांबा

साहित्यः एक डझन तयार पण घट्ट हापूस आंबे, साखर, लवंगा ४/५, वेलची दाणे( खरं तर या मुरांब्याला हापूस आंब्याचा इतका सुंदर सुगंध असतो की वेलची पण फिकी पडते.)

कृती: फोटोत दाखवल्याप्रमाणे आंब्याच्या दोन्ही बाजूचे काप काढून त्यावर उभ्या आडव्या रेघा मारून चमच्याने फोडी काढून घ्याव्यात. तयार फोडी मोजून घ्याव्यात, जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घ्यावी. साखर, लवंगा, वेलची दाणे सगळे एकत्र मिसळून दोन तास झाकून ठेवावे. साखर विरघळली की मिश्रण कढण्यास ठेवावे.

मिश्रण अधून मधून ढवळत रहावे.
पुरेसे घट्ट झालेय असे वाटले की डीशमध्ये थेंब टाकून पहावा. थेंब पसरत नाही असे वाटले की झाला मुरांबा तयार!
आत्ता आंबे मिळतायत तोपर्यंत मुरांबा बरणीत भरून ठेवावा, एकदा सिझन संपला की मुरांबा खाऊन आंब्याची कसर भरून काढता येते. कोणत्याही मोसमात आंब्याची मज्जा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा