कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

गुळांबा

साहित्यः कैरीचा कीस दोन वाट्या, गूळ चार वाट्या, वेलची पावडर, लवंगा दोन तीन.
कृती: कैय्रा धुऊन साले काढून घ्यावीत. साले काढलेल्या कैय्रा किसाव्यात. किसाच्या दुप्पट गूळ घेऊन तो किसलेल्या कैरीत मिसळावा. दोन तास मिश्रण झाकून ठेवावे. दोन तासानंतर गूळ विरघळला की लवंगा घालून मिश्रण गॅसवर कढवायला ठेवावे. मिश्रणाचा थेंब डीशमध्ये टाकून पहावा. थेंब पसरत नसेल तर गुळांबा तयार झाला असे समजावे. तयार गुळांब्यात वेलची पावडर मिसळावी.
या गुळांब्याला वेळ कमी लागतो. गूळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त करावे. त्यासाठी गूळ एकत्र करून ठेवलेल्या मिश्रणाची गॅसवर ठेवण्यापूर्वी चव पहावी. गुळांब्याची चव छान खमंग लागते. एकदा करून ठेवला की वर्षभरात कधीही मुलांना जॅमऐवजी देता येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा