कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, २४ एप्रिल, २०१९

आंब्याची सांज्याची पोळी/आंब्याची सांजोरी:

आंब्याची सांज्याची पोळी/आंब्याची सांजोरी:


  • साहित्य:
  •  १ कप( 250ml) रवा,
  •  १ कप साखर,
  •  १ कप पाणी,
  •  १ कप ताजा आमरस,
  •  १ टेबलस्पून तूप, 
  • १ टीस्पून वेलची पावडर,
  •  मीठ, 
  • तांदूळ पिठी लाटताना लावायला
  • पारीसाठी: 
  • अडीच कप कणिक, 
  • १टीस्पून मीठ, 
  • 1/4 कप आमरस, 
  • १ टेबलस्पून तेलाचे मोहन
  •  पाणी
  • कृती: 
  • हापूस आंबे स्वच्छ धुवून रस काढून घ्या. 
  • कढईत रवा घेऊन तुपावर भाजा,
  •  अगदी शिऱ्यासाठी भाजतो तसा खमंग नको. 
  • १ कप पाणी गरम करून घ्या. 
  • साखर मोजून घ्या. 
  • रवा भाजल्यावर त्यात पाणी, साखर, आमरस एकत्र करून हळूहळू मिक्स करा. 
  • पाव टीस्पून मीठ घाला. 
  • गुठळी होऊ देऊ नका.
  •  मंद गॅसवर वाफ येऊ द्या.

    कणिक चाळून घ्या.
  •  त्यात मीठ घाला.
  •  तेल गरम करून घाला
  • . थोडं गार झाल्यावर 1/4 कप आमरस आणि लागेल तसं पाणी घेऊन नेहमीच्या कणकेपेक्षा थोडी सैल कणिक भिजवा.
  •  झाकून ठेवा. 
  • तयार शिरा गार होऊ द्या.
  •  पिठाचा आणि शिऱ्याचा सारखा गोळा घ्या. 

  • पुरणपोळी सारखं भरून तांदूळ पिठीवर पोळी लाटा.
  •  तवा गरम करून थोडं तेल लावून दोन्ही बाजू खमंग भाजून घ्या. 

    गरमागरम पोळीचा दूध आणि तुपासोबत आस्वाद घ्या. नारळाच्या दुधासोबत मस्त लागते.

    ✍🏻मिनल सरदेशपांडे

गुरुवार, १८ एप्रिल, २०१९

कलिंगडाच्या पांढऱ्या भागाची बर्फी:

कलिंगडाच्या पांढऱ्या भागाची बर्फी: 


  • साहित्य: 2 कप कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचा किस,
  •  1 कप खवा, 
  • 1 कप साखर, 
  • 1 टेबलस्पून साजूक तूप
  • कृती: 
  • कलिंगडाचा पांढरा भाग किसून घ्या. 
  • कढईत तूप तापत ठेवा.
  •  कलिंगडाच्या किसाला जे पाणी सुटेल ते गाळून बाजूला ठेवा. 
  • आता किस तुपावर दहा मिनिटं परता.
  •  त्यात खवा साखर मिक्स करून गोळा होईपर्यंत परतत रहा. 
  • ताटाला तुपाचा हात लावून घ्या.
  •  गोळा ताटावर थापून आवडीच्या आकारात कापा.
  • ही वडी बर्फीसारखी मऊ छान लागते.
  • ✍🏻 मिनल सरदेशपांडे

गवार बटाटा भाजी:

गवार बटाटा भाजी: 


  • गवार अर्धा की,
  •  बटाटे तीन मध्यम, 
  • तेल 1 टेबलस्पून, 
  • मोहोरी 1/4 टीस्पून,
  •  1/4 टीस्पून हिंग, 
  • 1/2 टीस्पून हळद, 
  • एक टीस्पून लाल तिखट,
  •  1 टीस्पून साखर, 
  • ओलं खोबरं 2 टेबलस्पून, 
  • मीठ 1/2 टीस्पून
  • कृती:
  •  गवार धुवून तुकडे करा. 
  •  धुवून सालासकट काचऱ्या करा.
  •  गवार चाळणीत ठेवून वाफवून घ्या,म्हणजे त्यात पाणी जाणार नाही.
  •  कढईत तेल तापवा.
  •  मोहोरी घाला, ती तडतडली की बटाटे काचऱ्या घालून बारीक गॅसवर परतत रहा.
  •  बटाटे छान परतले की हिंग, हळद, तिखट आणि थोडं मीठ घाला. 
  • परत परता. 
  • आता वाफवलेली गवार घाला. 
  • ओलं खोबरं आणि साखर गवारीसाठी मीठ घाला आणि छान परतून एक वाफ काढा. 
  • ✍🏻मिनल सरदेशपांडे

बुधवार, १७ एप्रिल, २०१९

कणकेचे झटपट कप केक



  • साहित्य: 
  • 1 कप(250ml) कणिक,
  •  1/2 कप दूध, 
  • 1/2 कप रिफाईंड सनफ्लॉवर तेल, 
  • 1 टीस्पून खायचा सोडा, 
  • अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, 
  • 1 टीस्पून लिंबू रस,
  •  3/4 कप पिठीसाखर, 
  • 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स,
  •  2 टीस्पून कोको पावडर,
  •  2 टीस्पून लिक्विड कॉफी( मी फिल्टर वापरली)
  • कृती
  • कणिक, साखर, सोडा, बेकिंग पावडर आणि कोको पावडर हे सर्व दोनदा चाळून घ्या.
  •  दूध, तेल, कॉफी, व्हॅनिला इसेन्स, लिक्विड कॉफी एकत्र करा. 
  • पसरट कढईत दीड वाटी मीठ पसरा, 
  • दहा मिनिटं मोठ्या गॅसवर प्रिहीट करा. 
  • साच्यांना आतून तेल लावून घ्या. 
  • सुक्या मिश्रणात पातळ मिश्रण हळूहळू मिक्स करा, एकाच दिशेने ढवळत रहा.
  •  लिंबू रस घालून ढवळा.
  •  तयार मिश्रण एकेका साच्यात अर्धा कप भरा. 
  • वर टुटीफ्रुटी, ड्रायफ्रूटस् घाला. मिठावर कुकर मधली जाळी ठेवा. 
  • त्यावर पसरट ताटली ठेवून तयार कप ठेवा. 
  • कढई वर व्यवस्थित झाकण ठेवून मध्यम गॅसवर 20 मिनिटं बेक करा.
  •  सूरी घालून चेक करा.

कढीलिंबाची चटणी:

कढीलिंबाची चटणी:
बागेत काम करायला कामगार आले आणि भरपूर कढीलिंब फांद्या कापल्या. एवढा कढीलिंब पाहिल्यावर चटणी करायचा मोह आवरेना!
  • साहित्य:
  • 2 कप(250ml) पूर्ण भरून कढीलिंब पाने,
  •  1/4 कप तीळ,
  •  1/2 कप सुकं खोबरं,
  •  2 टेबलस्पून तेल, 
  • लाल तिखट 1 टेबलस्पून, 
  • 1/3 कप डाळं, 
  • 1 टीस्पून साखर, 
  • 1 टीस्पून मीठ, 
  • 1टीस्पून चिंच
  • कृती: 
  • कढीलिंबाची पाने स्वच्छ धुवून कापडावर पसरून कोरडी करा.
  •  खोबरं किसून भाजून घ्या.
  •  तीळ भाजून घ्या. 
  • कढईत मंद गॅसवर तेलात पाने परतत रहा.
  •  कुरकुरीत होऊ द्या. 
  • एकेक वस्तू मिक्सरला बारीक करा.
  •  चिंच वेगळी मिक्सरला फिरवून घ्या.
  •  बारीक केलेलं साहित्य, मीठ, साखर, तिखट, चिंच एकत्र करून परत एकदा मिक्सरला फिरवा.
  •  चवीप्रमाणे हवं ते वाढवा.
  • मस्त चटणी तयार आहे.


✍🏻मिनल सरदेशपांडे

किवी, लिंबू, पुदिना सरबत:


  • किवी, लिंबू, पुदिना सरबत:
  • साहित्य:
  • 2 किवी,
  • 1 लिंबू,
  • 1 टेबलस्पून पुदिना पाने,
  • 4 टीस्पून साखर,
  • 1/2 चमचा मीठ,
  • चिमूटभर काळं मीठ,
  • पाऊण लीटर पाणी,
  • बर्फाचे खडे

  • कृती:
  • किवी स्वच्छ धुवून साल काढून घ्या.
  • लिंबू धुवून, कापून रस काढून घ्या. 
  • पुदिना धुवून घ्या.
  • किवीचे तुकडे, लिंबू रस, साखर, पुदिना, थोडं पाणी घालून ज्युसर जारला फिरवून घ्या.
  •  त्यात दोन्ही मीठ, पाणी घालून परत फिरवा.
  • हवं तर गाळून घ्या. बर्फाचे खडे घालून गारेगार सर्व्ह करा.

चिक्कू हॉरलिक्स शेक:

चिक्कू हॉरलिक्स शेक:


मुलांच्या सुट्टीसाठी खास मुलांच्या आवडीच्या फ्लेवरचा मिल्कशेक

  • साहित्य:
  •  दोन मध्यम पिकलेले चिक्कू,
  • 1 टीस्पून हॉरलिक्स, 
  • 1 टीस्पून साखर, 
  • 250मिली गार दूध
  • कृती: 
  • चिक्कू स्वच्छ धुवून घ्या. 
  • साल आणि बिया काढून फोडी करा.
  •  ज्युसर जारला चिक्कू फोडी, साखर, हॉरलिक्स, फिरवून घ्या. 
  • दूध मिक्स करून परत एकदा फिरवा.
  • सर्व्ह करताना ग्लास मध्ये ओतून वर हॉरलिक्स भुरभुरावे!