कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १८ एप्रिल, २०१९

कलिंगडाच्या पांढऱ्या भागाची बर्फी:

कलिंगडाच्या पांढऱ्या भागाची बर्फी: 


  • साहित्य: 2 कप कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचा किस,
  •  1 कप खवा, 
  • 1 कप साखर, 
  • 1 टेबलस्पून साजूक तूप
  • कृती: 
  • कलिंगडाचा पांढरा भाग किसून घ्या. 
  • कढईत तूप तापत ठेवा.
  •  कलिंगडाच्या किसाला जे पाणी सुटेल ते गाळून बाजूला ठेवा. 
  • आता किस तुपावर दहा मिनिटं परता.
  •  त्यात खवा साखर मिक्स करून गोळा होईपर्यंत परतत रहा. 
  • ताटाला तुपाचा हात लावून घ्या.
  •  गोळा ताटावर थापून आवडीच्या आकारात कापा.
  • ही वडी बर्फीसारखी मऊ छान लागते.
  • ✍🏻 मिनल सरदेशपांडे

२ टिप्पण्या:

  1. वाह.. जरा हटके.. प्रत्येक टप्यावर फोटो असल्याने पदार्थ आपल्या समोर तयार होतोय असे वाटते...अर्थाथा
    Zakaaaaassssss ...

    उत्तर द्याहटवा