गवार बटाटा भाजी:
- गवार अर्धा की,
- बटाटे तीन मध्यम,
- तेल 1 टेबलस्पून,
- मोहोरी 1/4 टीस्पून,
- 1/4 टीस्पून हिंग,
- 1/2 टीस्पून हळद,
- एक टीस्पून लाल तिखट,
- 1 टीस्पून साखर,
- ओलं खोबरं 2 टेबलस्पून,
- मीठ 1/2 टीस्पून
- कृती:
- गवार धुवून तुकडे करा.
- धुवून सालासकट काचऱ्या करा.
- गवार चाळणीत ठेवून वाफवून घ्या,म्हणजे त्यात पाणी जाणार नाही.
- कढईत तेल तापवा.
- मोहोरी घाला, ती तडतडली की बटाटे काचऱ्या घालून बारीक गॅसवर परतत रहा.
- बटाटे छान परतले की हिंग, हळद, तिखट आणि थोडं मीठ घाला.
- परत परता.
- आता वाफवलेली गवार घाला.
- ओलं खोबरं आणि साखर गवारीसाठी मीठ घाला आणि छान परतून एक वाफ काढा.
- ✍🏻मिनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा