बागेत काम करायला कामगार आले आणि भरपूर कढीलिंब फांद्या कापल्या. एवढा कढीलिंब पाहिल्यावर चटणी करायचा मोह आवरेना!
- 2 कप(250ml) पूर्ण भरून कढीलिंब पाने,
- 1/4 कप तीळ,
- 1/2 कप सुकं खोबरं,
- 2 टेबलस्पून तेल,
- लाल तिखट 1 टेबलस्पून,
- 1/3 कप डाळं,
- 1 टीस्पून साखर,
- 1 टीस्पून मीठ,
- 1टीस्पून चिंच
- कृती:
- कढीलिंबाची पाने स्वच्छ धुवून कापडावर पसरून कोरडी करा.
- खोबरं किसून भाजून घ्या.
- तीळ भाजून घ्या.
- कढईत मंद गॅसवर तेलात पाने परतत रहा.
- कुरकुरीत होऊ द्या.
- एकेक वस्तू मिक्सरला बारीक करा.
- चिंच वेगळी मिक्सरला फिरवून घ्या.
- बारीक केलेलं साहित्य, मीठ, साखर, तिखट, चिंच एकत्र करून परत एकदा मिक्सरला फिरवा.
- चवीप्रमाणे हवं ते वाढवा.
- मस्त चटणी तयार आहे.
✍🏻मिनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा