आंब्याची सांज्याची पोळी/आंब्याची सांजोरी:
- साहित्य:
- १ कप( 250ml) रवा,
- १ कप साखर,
- १ कप पाणी,
- १ कप ताजा आमरस,
- १ टेबलस्पून तूप,
- १ टीस्पून वेलची पावडर,
- मीठ,
- तांदूळ पिठी लाटताना लावायला
- पारीसाठी:
- अडीच कप कणिक,
- १टीस्पून मीठ,
- 1/4 कप आमरस,
- १ टेबलस्पून तेलाचे मोहन
- पाणी
- कृती:
- हापूस आंबे स्वच्छ धुवून रस काढून घ्या.
- कढईत रवा घेऊन तुपावर भाजा,
- अगदी शिऱ्यासाठी भाजतो तसा खमंग नको.
- १ कप पाणी गरम करून घ्या.
- साखर मोजून घ्या.
- रवा भाजल्यावर त्यात पाणी, साखर, आमरस एकत्र करून हळूहळू मिक्स करा.
- पाव टीस्पून मीठ घाला.
- गुठळी होऊ देऊ नका.
- मंद गॅसवर वाफ येऊ द्या.
कणिक चाळून घ्या. - त्यात मीठ घाला.
- तेल गरम करून घाला
- . थोडं गार झाल्यावर 1/4 कप आमरस आणि लागेल तसं पाणी घेऊन नेहमीच्या कणकेपेक्षा थोडी सैल कणिक भिजवा.
- झाकून ठेवा.
- तयार शिरा गार होऊ द्या.
- पिठाचा आणि शिऱ्याचा सारखा गोळा घ्या.
- तवा गरम करून थोडं तेल लावून दोन्ही बाजू खमंग भाजून घ्या.
गरमागरम पोळीचा दूध आणि तुपासोबत आस्वाद घ्या. नारळाच्या दुधासोबत मस्त लागते.
✍🏻मिनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा