- साहित्य:
- 1 कप(250ml) कणिक,
- 1/2 कप दूध,
- 1/2 कप रिफाईंड सनफ्लॉवर तेल,
- 1 टीस्पून खायचा सोडा,
- अर्धा टीस्पून बेकिंग पावडर,
- 1 टीस्पून लिंबू रस,
- 3/4 कप पिठीसाखर,
- 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स,
- 2 टीस्पून कोको पावडर,
- 2 टीस्पून लिक्विड कॉफी( मी फिल्टर वापरली)
- कृती:
- कणिक, साखर, सोडा, बेकिंग पावडर आणि कोको पावडर हे सर्व दोनदा चाळून घ्या.
- दूध, तेल, कॉफी, व्हॅनिला इसेन्स, लिक्विड कॉफी एकत्र करा.
- पसरट कढईत दीड वाटी मीठ पसरा,
- दहा मिनिटं मोठ्या गॅसवर प्रिहीट करा.
- साच्यांना आतून तेल लावून घ्या.
- सुक्या मिश्रणात पातळ मिश्रण हळूहळू मिक्स करा, एकाच दिशेने ढवळत रहा.
- लिंबू रस घालून ढवळा.
- तयार मिश्रण एकेका साच्यात अर्धा कप भरा.
- वर टुटीफ्रुटी, ड्रायफ्रूटस् घाला. मिठावर कुकर मधली जाळी ठेवा.
- त्यावर पसरट ताटली ठेवून तयार कप ठेवा.
- कढई वर व्यवस्थित झाकण ठेवून मध्यम गॅसवर 20 मिनिटं बेक करा.
- सूरी घालून चेक करा.
कोकण मेवा हा ब्लॉग शोधा
बुधवार, १७ एप्रिल, २०१९
कणकेचे झटपट कप केक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा