- किवी, लिंबू, पुदिना सरबत:
- साहित्य:
- 2 किवी,
- 1 लिंबू,
- 1 टेबलस्पून पुदिना पाने,
- 4 टीस्पून साखर,
- 1/2 चमचा मीठ,
- चिमूटभर काळं मीठ,
- पाऊण लीटर पाणी,
- बर्फाचे खडे
- कृती:
- किवी स्वच्छ धुवून साल काढून घ्या.
- लिंबू धुवून, कापून रस काढून घ्या.
- पुदिना धुवून घ्या.
- किवीचे तुकडे, लिंबू रस, साखर, पुदिना, थोडं पाणी घालून ज्युसर जारला फिरवून घ्या.
- त्यात दोन्ही मीठ, पाणी घालून परत फिरवा.
- हवं तर गाळून घ्या. बर्फाचे खडे घालून गारेगार सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा