नवलकोल मुगडाळ भाजी:
- साहित्य:
- पाच नवलकोल कांदे,
- अर्धी वाटी मुगडाळ,
- तीन ओल्या मिरच्या,
- कढीलिंब पाने,
- मीठ,
- साखर,
- तेल दोन टेबलस्पून,
- मोहोरी पाव चमचा,
- जीरं पाव चमचा,
- हिंग पाव चमचा,
- हळद पाव चमचा,
- खोबरं अर्धी वाटी,
- कोथिंबीर अर्धी वाटी
- कृती: मुगडाळ रात्री भिजत घालून ठेवा.
- अलकोलची पाने काढून बाजूला ठेवा. (याची परतून, पीठ पेरून भाजी, पराठे करून शकता किंवा आमटीत घालू शकता.)
- अलकोल धुवून घ्या.
- नारळाचे करतो तसे दोन भाग करून खवून घ्या किंवा साल काढून किसून घ्या.
- (सकाळी गडबडीने भाजी नको असेल तर डाळ धुवून या किसलेल्या अलकोलमध्ये पण भिजवून ठेवू शकता.)
- कढईत तेल तापवा. मोहोरी, जीरं, मिरच्यांचे तुकडे, हळद घालून फोडणी करा.
- आता किसलेला अलकोल आणि भिजलेली मुगडाळ मिक्स करून फोडणीत घाला.
- कढीलिंब पाने घालून नीट परता.
- मंद गॅसवर झाकण ठेवून शिजू द्या.
- अधेमधे परतत रहा.
- डाळ शिजली की मीठ, साखर घाला.
- परतत रहा.
- भाजीला सुटलेला रस आटला की खोबरं कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
- मला तर अशी भाजी खोबरं, कोथिंबीर घालून नुसतीच खायला आवडते.
- ✍🏻 मिनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा