कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १८ जुलै, २०१९

काप्या फणसाचा मुरांबा: मुरफणस

काप्या फणसाचा मुरांबा:


      काय मंडळी संपले का आंबे गरे? कुठेतरी राहिला असेल एखादा फणस...पण पावसात गरे चविष्ट नसतात त्यामुळे खाल्ले जात नाहीत! आता त्यावर उपाय सांगते ज्यामुळे तुम्ही अगदी उशिरापर्यंत फणसाचा आस्वाद घेऊ शकता!
साहित्य: 
एक वाटी कापे गरे, पाऊण वाटी साखर, दोन लवंगा, पाणी अर्ध्या वाटीला थोडं कमी
कृती:
 कापे गरे साफ करून लांब किंवा आवडीप्रमाणे तुकडे करा.
 एका डब्यात झाकण लावून गरे कुकरमध्ये दहा मिनिटं वाफवून घ्या.
गऱ्यात पाणी घालू नका.
 साखरेत पाणी आणि लवंगा घालून एकतारी पाक करा.
वाफवलेले गरे घालून पाक परत उकळत ठेवा.
 डिशमध्ये थेंब टाकून पसरला नाही की मुरांबा/मुरफणस तयार झाला.
 गरे बऱ्यापैकी पारदर्शक होतात. गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा.
आता हवा तेव्हा फणसाचा आस्वाद घेता येईल!
✍🏻मीनल सरदेशपांडे

२ टिप्पण्या:

  1. फ्रीज बाहेर रहातो का हा मुरगरा असेल तर किती दिवस

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. फ्रिजबाहेर नाही रहात फ्रीजमध्ये भरपूर टिकतो माझा सहा महिने होता

      हटवा