- साहित्य
- एक वाटी तांदूळ
- एक वाटी साखर
- चार पाच लवंगा
- एक वाटी अननसाच्या फोडी
- एक वाटी अननसाचा रस
- एक चमचा अननस इसेन्स(ऐच्छिक)
- काजूगर
- बेदाणे
- चार चमचे तूप
- खाण्याचा पिवळा रंग
- मीठ
- कृती:
- तांदूळ धुवावेत, चाळणीवर निथळत ठेवावेत.
- अननस कापून मधला जाड दांडा आणि साल काढून फोडी कराव्यात.
- एक वाटी रस होईल एवढया फोडी ज्युसर जारला फिरवून रस गाळून घ्यावा.
- एक वाटी फोडी तशाच ठेवाव्यात.
- कढईत तूप तापत ठेवावे.
- त्यात लवंगा घालाव्यात.
- लवंगा तळल्या की त्यात तांदूळ घालून परतावेत.
- तांदूळ परतले की कुकरच्या डब्यात काढून त्यात दुप्पट पाणी घालून आणि चिमुटभर खायचा रंग घालून भात शिजवून घ्यावा.
- शिजलेला भात परातीत मोकळा करायला ठेवावा.
- कढईत साखर, अननसाचा रस, मीठ घालून साखर विरघळून घ्यावी.
- इसेन्स घालावा.
- काजूगर बेदाणे घालावे.
- आता त्यात तयार भात मिसळावा.
- बाजूने तूप सोडून पाच मिनिटं वाफ काढावी.
- भात तयार झाला की सर्व्ह करताना अननसाच्या फोडींनी सजवून वाढावा.
कोकण मेवा हा ब्लॉग शोधा
मंगळवार, ९ जानेवारी, २०१८
अननसाचा गोड भात
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
vedshreelimaye@gmail.com
उत्तर द्याहटवा