गूळ नारळ पोहे:
आता मुलांना भूक लागली की मॅगी आठवते, आम्हाला मात्र पोहे आठवायचे. घरात असलेल्या पदार्थांपासून तयार होणारा आरोग्यदायी नाश्ता!
चार वाट्या जाड पोहे घ्या. दीड वाटी ताजं ओलं खोबरं घ्या. एक वाटी नारळ पाण्याचा पोह्यांवर हबका मारा. गूळ बारीक चिरून घ्या. पोह्यात ताजं ओलं खोबरं, चिमूटभर मीठ, दोन टेबलस्पून गूळ घालून पोहे नीट कालवून घ्या. थोडा वेळ दडपून ठेवा. उगीच तुम्हाला हवी तर वेलची पावडर भुरभुरवा. गूळ खोबऱ्याचा खमंगपणा येतो छान... आणि मधेच एखादा गुळाचा खडा आला की काय मस्त लागतं.. अहाहा!! यात खोबरं मात्र ताजंच हवं. नारळ पाणी नसेल तर दुधाचा हबका मारू शकता. पोहे चावून चावून खायला नको असतील पातळ पोहे घेऊ शकता. बघा कधीतरी असा नाश्ता करून!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा