- टॉमेटो रस्सम:
- रस्सम पावडर:
- साहित्य: पाच टेबलस्पून तूर डाळ, पाच टेबलस्पून चणाडाळ, पाच टीस्पून धने, दोन टीस्पून जीरं, दोन टीस्पून मिरी, सुक्या मिरच्या दहा बारा, काश्मिरी लाल तिखट 1 टीस्पून
- कृती: डाळी, धने, जीरं, मिरी, मिरच्या सगळं वेगवेगळं भाजून घ्या. गार करून पावडर करा, शेवटी लाल तिखट घालून परत एकदा फिरवा.
- डब्यात भरून ठेवा.
- साहित्य:
- 1/4 कप तुरडाळ,
- 4 टॉमेटो,
- रस्सम पावडर दोन टीस्पून,
- लाल तिखट 1 टीस्पून,
- कढीलिंबाची पानं 4/5,
- तेल 1 टेबलस्पून,
- 1 टीस्पून चिंचेचा कोळ,
- 1/2 टीस्पून हिंग पावडर
- कृती:
- दोन तीन वेळा स्वच्छ धुवून दुप्पट पाणी घालून तूरडाळ कूकरमध्ये शिजवून घ्या.
- टॉमेटो चार भाग करून शिजवून घ्या.
- गार होऊ द्या.
- मिक्सरमधून शिजलेले टॉमेटो फिरवून घ्या, फक्त लक्षात ठेवा अगदी बारीक व्हायला नको.
- कढईत तेल तापवा.
- मोहोरी, हिंग घाला.
- लाल तिखट, रस्सम पावडर घालून मंद गॅसवर परता.
- कढीलिंबाची पानं घाला.
- आता फिरवलेला टॉमेटो, तूरडाळ घोटून फोडणीत घाला.
- दोन कप पाणी घाला.
- चिंचेचा कोळ घाला.
- चवीनुसार मीठ घाला.
- उकळी येऊ द्या.
- चव बघून हवं असेल ते वाढवा.
- गरमागरम रस्सम भातासोबत सर्व्ह करा.
- ✍🏻 मीनल सरदेशपांडे
कोकण मेवा हा ब्लॉग शोधा
मंगळवार, ४ जून, २०१९
टॉमेटो रस्सम:
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा