- भोपळी मिरची भाजणी पेरून:
- साहित्य:
- अर्धा की भोपळी मिरची,
- 1 कांदा,
- अर्धा कप भाजणी,
- लाल तिखट अर्धा टीस्पून,
- मीठ,
- साखर अर्धा टीस्पून,
- तेल दोन टेबलस्पून,
- फोडणीचे साहित्य
- कृती:
- भोपळी मिरची स्वच्छ धुवा आणि पुसून बिया काढून घ्या.
- बारीक चिरा. कांदा सोलून चिरून घ्या.
- कढईत तेल तापवा. मोहोरी, हळद, लाल तिखट घालून फोडणी करा.
- कांदा आणि भोपळी मिरची फोडणीत घालून परता.
- झाकण ठेवून पाच मिनिटं बारीक गॅसवर वाफ येऊ द्या.
- मिरची शिजली की त्यात मीठ , साखर घालून ढवळा.
- भाजणी पेरून नीट ढवळा. परत एक वाफ काढा, चवीनुसार लागेल ते वाढवा.
- मस्त भाजी तयार आहे!
- टीप: भाजणी ऐवजी बेसन पण वापरू शकता, पण भाजणी खमंग लागते.
- पीठ तुम्हाला हवं तर थोडं आणखी घ्या, पण पीठ जास्त झालं तर भाजी कोरडी होते.
- ओलं खोबरं, कोथिंबीर आवडीप्रमाणे घालू शकता.
- भोपळी मिरची तिखट नसते त्यामुळे तिखट आणखी लागू शकते.
कोकण मेवा हा ब्लॉग शोधा
शुक्रवार, २८ जून, २०१९
भोपळी मिरची भाजणी पेरून:
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा