कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, २६ मार्च, २०१८

खुबानी (जर्दाळू) कस्टर्ड

खुबानी (जर्दाळू) कस्टर्ड बनवण्यासाठी साहित्य 

  • खुबानी का मिठा साठी: जर्दाळू पाव की
  • साखर 150 ग्रॅम
  • दालचिनी पावडर चिमुटभर
  • पाणी चार वाट्या
  • कस्टर्ड साठी: दूध एक ली
  • साखर 200 ग्रॅम
  • कस्टर्ड पावडर( व्हॅनिला) तीन टेबल स्पून
  • क्रीम 200 मिली
  • सजावटीसाठी: जर्दाळू तल्या बिया

     रात्री चार वाट्या पाणी घेऊन त्यात जर्दाळू भिजत घालावेत.

 

 

  1. सकाळी जर्दाळू चाळणीवर काढा, त्यातले पाणी पण वापरायचे आहे म्हणून चाळण पातेल्यावर ठेवा.
  2. जर्दाळू तील बिया काढून स्वच्छ करून वाळत ठेवा.
  3. कढईत जर्दाळू भिजवलेले पाणी घ्या.
  4. त्यात साखर घालून एक तारी पाक करा.
  5. त्यात भिजवलेले जर्दाळू घालून पाच मिनिटं उकळवा.
  6. दालचिनी पावडर घालून गॅस बंद करा.
  7. खुबानी का मिठा तयार आहे, ते गार होऊ द्या.
    तयार खुबानी का मिठा

    1. कस्टर्ड साठी: एक ली फूल क्रीम दूध घ्या.
    2. त्यातील एक वाटी बाजूला ठेवून बाकी तापवा.
    3. बाजूला ठेवलेल्या दुधात कस्टर्ड पावडर मिसळा, गुठळी मोडा.
    4. तापत ठेवलेल्या दुधात साखर मिसळा.
    5. उकळी आली की कस्टर्ड मिश्रित दूध हळूहळू ओता आणि ढवळत रहा.
    6. दूध घट्ट होईपर्यंत सतत ढवळा.
    7. गार होऊ द्या.
    8. जर्दाळू च्या वाळत ठेवलेल्या बिया फोडा आतील बदाम काढा.
    9. त्याचे काप करा
    10. हे काप आपण सजावटीला वापरू.
    11. क्रीम बिटरने घुसळून घ्या.
    12. कस्टर्ड गार झाले की क्रीम मिसळा.
    13. आता कस्टर्ड चार पाच तास फ्रीजर मध्ये सेट करा.
    14. खुबानी का मिठा फ्रीजमध्ये गार करा.
    15. सर्व्ह करताना कस्टर्ड त्यावर खुबानी का मिठा त्यावर बदाम काप पसरून सर्व्ह करा.
    16. परफेक्ट पार्टी डेझर्ट तयार आहे!
    17. बघा करून... अप्रतिम चव लागते!

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा