द्राक्षाचं सरबत बनवण्यासाठी साहित्य
- दोन वाट्या काळी द्राक्ष
- दोन वाट्या हिरवी द्राक्ष
- अर्धी वाटी साखर
- मीठ
- पाणी
- वेलची पावडर अर्धा चमचा
- दोन्ही द्राक्षं मिठाच्या पाण्यात दहा मिनिटं ठेवा.
- स्वच्छ धुवा.
- ज्युसर जारमध्ये थोडं पाणी घालून द्राक्ष फिरवा.
- गाळणीने गळून घ्या.
- द्राक्ष रसाच्या तिप्पट पाणी घाला.
- मीठ, साखर वेलची पावडर मिसळा.
- चव बघून मीठ साखर पाणी घाला
- थंडगार करून सर्व्ह करा.
- दोन्ही द्राक्ष एकत्र केल्याने अप्रतिम कलर येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा