काजू पिस्ता रोल: 
साहित्य: काजूगर एक वाटी, साखर अर्धी वाटी, पाणी पाव वाटी, वेलची पावडर
रोलसाठी: पिस्ता 25 ग्रॅम, बदाम 25 ग्रॅम, पिठीसाखर एक टेबलस्पून, दूध अर्धा टेबलस्पून, खाण्याचा हिरवा रंग दोन थेंब, वेलची पावडर
कृती:
पिस्ता आणि बदाम वेगवेगळे मिक्सरला लावून भरडसर वाटून घ्यावे, त्यात पिठीसाखर, चिमूटभर वेलची पावडर घालून मिक्स करावे. दुधात कलर घालून ते दूध हळूहळू या मिश्रणात मिक्स करावे. व्यवस्थित रोल होईल एवढे दूध घालावे. मिसळून घेऊन लांब करंगळीएवढे रोल करून ठेवावेत.
काजूगर थोडे थोडे घेऊन पावडर करावी. अर्धी वाटी साखरेत पाव वाटी पाणी घालून गॅसवर ठेवावे. साखर विरघळू द्यावी. पूर्ण विरघळली की काजू पावडर आणि चिमूटभर वेलची पावडर घालून मिक्स करावे. दोन मिनिटं शिजवावे. खाली उतरून घोटत रहावे. जाड पिशवी दोन कडा कापून सरळ करावी. त्याला तूप लावावे. काजूचा गोळा घट्ट झाला की पिशवीवर अर्ध्या भागात काढून घ्यावा, अर्धा भाग त्यावर ठेवून लाटण्याने चौकोनी लाटावे.
लांब चार पट्ट्या कापून घ्याव्या, तयार पिस्ता रोल त्यावर ठेवून पिशवी सोडवत पट्टी त्याला गुंडाळून घ्यावी.
रोल घट्ट वळावेत.
आवडीप्रमाणे तुकडे करावेत.

साहित्य: काजूगर एक वाटी, साखर अर्धी वाटी, पाणी पाव वाटी, वेलची पावडर
रोलसाठी: पिस्ता 25 ग्रॅम, बदाम 25 ग्रॅम, पिठीसाखर एक टेबलस्पून, दूध अर्धा टेबलस्पून, खाण्याचा हिरवा रंग दोन थेंब, वेलची पावडर
पिस्ता आणि बदाम वेगवेगळे मिक्सरला लावून भरडसर वाटून घ्यावे, त्यात पिठीसाखर, चिमूटभर वेलची पावडर घालून मिक्स करावे. दुधात कलर घालून ते दूध हळूहळू या मिश्रणात मिक्स करावे. व्यवस्थित रोल होईल एवढे दूध घालावे. मिसळून घेऊन लांब करंगळीएवढे रोल करून ठेवावेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा