मसाला फरसबी:
साहित्य: अर्धा किलो फरसबी, दोन मोठे कांदे, दहा बारा लसूण पाकळ्या, एक इंच आलं, 1 मसाला वेलची, दोन साधी वेलची, दालचिनी तुकडा एक इंच, एक टीस्पून धने, अर्धा टीस्पून जीरं, दोन टेबलस्पून तीळ, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, दोन टेबलस्पून तेल, मीठ, 1 टीस्पून साखर, कोथिंबीर बारीक चिरून, 1 टीस्पून आमचूर पावडर
कृती: फरसबी धुवून चिरून घ्यावी. वाफवून घ्यावी. कांदे सोलून चिरावेत. कढईत धने, जीरं, तीळ, दोन्ही वेलची, दालचिनी हे सर्व मसाले गरम करून घ्यावेत. त्याची पावडर करावी, त्यातच आलं लसूण घालून थोडं पाणी घालून पेस्ट करावी.
कढईत तेल तापत ठेवावे. त्यात कांदा घालून परतावा. कांदा मऊ झाला की तयार मसाला पेस्ट, मीठ, तिखट, हळद घालून परतावे.
फरसबी घालावी. आमचूर पावडर, साखर घालावी. पाच मिनिटं मंद गॅसवर झाकण ठेवून वाफवावी. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा