लिंबाचे टिकाऊ सरबत:
काल एका मैत्रिणीने छान घरची लिंबं दिली होती. उन्हाळ्याची सोय करून ठेवली.
✍🏻मिनल सरदेशपांडे
काल एका मैत्रिणीने छान घरची लिंबं दिली होती. उन्हाळ्याची सोय करून ठेवली.
- साहित्य: 1 कप(250ml) लिंबू रस,
- साखर अडीच कप,
- दोन टीस्पून वेलची पावडर,
- थोडया केशर काड्या,
- मीठ दोन टीस्पून,
- पाणी 1 कप
- .कृती:लिंबं स्वच्छ धुवा आणि पुसून घ्या.
- लिंबाचा रस काढा, मोजून घ्या. मला 18 लिंबं लागली 1 कप रसाला.
- रस गाळून घ्या.
- एका पातेल्यात साखर घ्या त्यात पाणी घालून पाक करत ठेवा.
- गोळीबंद पाक करा. वाटीत पाणी घेऊन त्यात थेंब टाकून पहा. मऊ गोळी झाली की गॅस बंद करा.
- पाकात लिंबू रस, वेलची पावडर, केशर, मीठ घाला.
- नीट ढवळा.
- पूर्ण गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा.
- बाहेर पण टिकतं.
- करायला घेताना ग्लासभर पाण्यात दोन चमचे तयार सिरप लागलं तर मीठ आणि बर्फ घालून गारेगार सर्व्ह करा.
✍🏻मिनल सरदेशपांडे
छान
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाथँक्स☺️
हटवा