कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

पनीर हरियाली

 पनीर हरियाली:


 साहित्य: पनीर 400 ग्रॅम, भोपळी मिरची पाव की, कांदे पाच मध्यम, आलं लसूण पेस्ट 1 टीस्पून, अर्धा कप पुदिना, अर्धा कप कोथिंबीर, 4 ओल्या मिरच्या, दही अर्धा कप, मिरी 10, लवंगा 4, दालचिनी एक छोटा तुकडा, धने एक टीस्पून, जीरं 1 टीस्पून, हिरवी वेलची 2, बटर किंवा तेल किंवा लोणी 1 टेबलस्पून, मीठ

कृती:  दही एक कापड घेऊन त्यात पाणी जायला टांगून ठेवा.भोपळी मिरची धुवून बिया काढून  एक इंचाचे चौकोनी तुकडे करा. तीन कांदे सोलून त्याचेही असेच तुकडे करा.   दोन कांदे सोलून पाण्यात ठेवून पाच मिनिटं उकळा. गार होऊ द्या. खडा मसाला गरम करून घ्या. आधी त्याची पावडर करून घ्या. आता कांदा आलं लसूण पेस्ट एकत्र फिरवून गुळगुळीत पेस्ट करा. कढईत  लोणी( मी घरचं लोणी वापरलं) तापत ठेवा. त्यात कांदा वाटप घाला. मसाला वाटप घाला. पाच मिनिटं परता. आता त्यात भोपळी मिरची आणि कांदा घालून परता. झाकण ठेवून वाफ येऊ द्या. तोपर्यंत पुदिना, कोथिंबीर आणि मिरच्या धुवून एकत्र वाटून घ्या. पनीरचे तुकडे करून त्याला मीठ थोडं हिरवं वाटप लावून दहा मिनिटं ठेवा.  कांदा आणि भोपळी मिरची शिजली की त्यात मीठ, दही, हिरवी चटणी आणि पनीर मिक्स करा. सावकाश परता. झाकण न ठेवता दहा मिनिटं मंद गॅसवर परता. चव बघून मीठ हवं तर वाढवा.

गरमागरम भाजी पोळी किंवा नान सोबत सर्व्ह करा.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा