नमस्कार मंडळी😊
मला माहिती आहे की रानमेवा असाच खाण्यात मजा असते.
आमच्या घरात मंडळी भरपूर म्हणून ताम्हिणीत येताना दिसलेल्या या आंबोळ्या( असे नाव विकणाऱ्या बाईने सांगितले) ती भरपूर पाच सहा वाटे घेऊन आले. दोन दिवसात ती छान पिकली. पण यावेळी सगळेच दुर्लक्ष करत होते.
मग मीठ साखर घालून ती तयार
फळे हाताने कुस्करून घेतली.
आलेला गर थोडा बारीक करून किंचित वेलची पावडर घालून सरबत केलं.
( हे सोनार काम आहे पण फुकट घालवणे आपल्या मनाला पटेना मग केले उद्योग🫣)
चव छानच आलीय.
आपल्या रत्नागिरी पट्ट्यात ही मिळतात का आणि नाव काय आहे? जाणकारांनी प्रकाश टाकावा.
✍️मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा