रवा भजी:
लेक येता घरा तोचि दिवाळी दसरा... त्यामुळे सध्या नवीन काय काय सुरू आहे.
त्याला भजी प्रकार खूप आवडतात. आज रव्याची भजी केली.
साहित्य: दोन वाट्या बारीक रवा, एक वाटी ताक, ओव्याची पाने दहा बारा, दोन गाजरं, तीन कांदे, मिरचीचे बारीक तुकडे, तिखट, मीठ, ओवा, बेसन दोन टेबलस्पून, पाणी, ओव्याची नसतील तर कढीलिंबाची पानं घाला.
रव्यात सगळं साहित्य, गाजर किसून, कांदे चिरून, पानं चिरून, मिरचीचे तुकडे, तिखट, मीठ, ओवा मिक्स करा. आधी ताक मग बघून लागेल तसं पाणी घाला. सैल करायचं नाहीये. कांदा भजी सोडतो तितपत पीठ होऊदे.
तेल गरम करून छोटी छोटी भजी मध्यम आचेवर तळून घ्या.
मिरची, कोथिंबीर, पुदिना, आवळा अशी चटणी केली होती मी.
त्यामानाने कमी साहित्यात होणारा झटपट प्रकार!
आवडीप्रमाणे भाज्या घ्या कोणत्याही.
✍️ मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा