पौष्टिक चटणी पुडी:
तर झालं काय मध्यंतरी मी अशा भोपळ्याच्या बिया, चणे, शेंगदाणे, सूर्यफूल बिया एकत्र करून खाण्यासाठी ठेवल्याची पोस्ट लिहिली.
तेव्हा माझी मैत्रीण Rupali Sohoni
म्हणाली की तिच्याकडे त्यातले दाणे तेवढे वेचून खातील आणि बाकी तिलाच खावं लागेल...अरेच्चा हे तर आपल्या लक्षातच आलं नाही. सगळ्यांच्या पोटात सगळं जावं हा उद्देश कसा सफल होणार?😄😄
आज दुसरी युक्ती.. हे सगळं एकत्र भाजून कुरकुरीत करून घेतलं.
साधारण बाकी सगळं एकेक वाटी आणि चणे दोन वाटी असे
एकत्र करून... त्यात तिखट, मीठ, साखर आणि आमचूर पावडर घालून भरडसर चटणी केली कोरडी!
आता त्यात वरून तेल घालून खा किंवा तूप... डोसा, आंबोळी बरोबर खा किंवा परतून भाजीत वरून पीठ पेरतो अशी घाला. बघा करून, आमच्याकडे तर आवडली.. आता वेचून बाजूला करायचा चान्स नाही😝😄😄😄
✍️ मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा