कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

चवळी उसळ

साहित्य:
 उसळीसाठी: दोन वाट्या लाल चवळी, दोन कांदे, दोन टॉमेटो, एक चमचा कांदा लसूण मसाला, एक चमचा गूळ, अर्धी वाटी ओलं खोबरं, मीठ, लाल तिखट लागल्यास, चार चमचे तेल, फोडणीचे साहित्य
कृती:
आदल्या दिवशी सकाळी चवळी भिजत घालावी. संध्याकाळी चाळणीवर उपसून ठेवावी. दुसऱ्या दिवशी छान मोड येतील. आता चवळी निवडून थोडे जास्त पाणी, मीठ आणि हळद घालून मऊ शिजवून घ्यावी. शिजल्यावर पाणी गाळून एका भांड्यात ठेवावे. सगळे पाणी गाळू नये. कांदे टॉमेटो बारीक चिरावे. कढई तापत ठेवावी. तेल घालावे. तापले की मोहोरी घालावी. कांदा, टॉमेटो घालून तेल सुटेपर्यंत परतावे. आता हळद, हिंग, कांदा लसूण मसाला घालून परतावे. शिजलेली चवळी घालावी. गूळ आणि लागल्यास मीठ घालावे. ओलं खोबरं घालून एक वाफ काढावी. लागल्यास थोडे पाणी घालावे. पोळी बरोबर वाढावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा