कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

पारंपरिक पक्वान्न: कडबू

साहित्य:

 एक वाटी चणाडाळ, दीड वाटी गूळ, अर्धी वाटी ओलं खोबरं, पाव वाटी खसखस, काजुगराचे तुकडे, बेदाणे, वेलची पावडर, जायफळ पावडर, मीठ, हळद.
पारीसाठी: तीन वाट्या कणिक, पाव वाटी तांदूळ पीठ, दोन चमचे तेल, मीठ पाणी
तळणीसाठी तेल
कृती:
 चणाडाळ धुवा आणि कुकरला दुप्पट पाणी, चिमुटभर हळद घालून पुरणासाठी शिजवतो तशी शिजवा. कणिक, तांदळाचे पीठ , चवीपुरते मीठ नीट मिक्स करा. दोन चमचे तेल गरम करून ते कणकेत मिसळा. घट्टसर कणिक मळून घ्या. झाकून ठेवा. शिजलेली डाळ चाळणीवर काढून पाणी जाऊ द्या. एका कढईत शिजलेली डाळ, अर्धी वाटी खोबरं, भाजून घेऊन खसखस, गूळ, चिमुटभर मीठ एकत्र करा. आता मंद गॅसवर ढवळत रहा. घट्ट होऊ लागलं की पाव चमचा, वेलची आणि पाव चमचा जायफळ पावडर घाला. आता काजूचे तुकडे, बेदाणे मिसळा. घट्ट झालं की गॅस बंद करा. गार होऊ द्या. कढईत तेल तापत ठेवा. पुरीसाठी घेतो तेवढी गोळी घेऊन पुरी लाटून घ्या, त्यात एक चमचा पूरण भरून करंजीसारखं बंद करून कातून घ्या. मध्यम आचेवर तळा. गरमागरम साजूक तुपासोबत फस्त करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा