कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

चवळीचे कळण:


साहित्य:
 चवळी गाळून ठेवलेले पाणी साधारण तीन वाट्या होईल, नारळाचे दूध चार वाट्या, ताक चार वाट्या, पाव चमचा लसूण पेस्ट, दोन तीन हिरव्या मिरच्या,जिरे अर्धा चमचा, पाव चमचा हिंग, तेल दोन चमचे, चिमुटभर हळद, कढिलिंबाची पाने सात आठ, साखर
कृती:
चवळीचे पाणी गार करून घ्यावे. त्यात ताक आणि नारळाचे दूध मिसळावे. तेलाची जीरं, हिंग, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हळद घालून फोडणी करावी. तयार मिश्रणात मीठ, साखर, कढिलिंबाची पाने,लसूण पेस्ट, फोडणी घालावी. जेवताना आधी थोडे गरम करावे. उकळी काढायची असेल तर आधी एक चमचा आरारूट तयार कळणाला लावावे. नाहीतर उकळल्यावर कळण फुटण्याची शक्यता असते. पावसात कळण प्यायला मजा येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा