कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

साखरभात

साहित्य:


 दोन वाट्या तांदूळ, दोन वाट्या साखर, एक लिंबू, वेलची पावडर, केशराच्या काड्या सात आठ, केशर सिरप, बेदाणे, काजूगर, मीठ, तूप दोन चमचे, पाच सहा लवंगा, पाणी
कृती:
तांदूळ धुवावेत, चाळणीवर निथळत ठेवावेत. पाणी निघून गेल्यावर कढईत तूप तापत ठेवावे. गॅस मंद ठेवून लवंगा घालाव्यात, त्या तडतडल्या की धुतलेले तांदूळ दोन मिनिटं परतावेत. परतलेले तांदूळ एका भांड्यात काढावेत. त्यात चार वाट्या पाणी, थोडं केशर सिरप घालून कुकरला भात शिजवून घ्यावा. तयार भात परातीत मोकळा करून ठेवावा. आता कढईत दोन वाट्या साखर, एक वाटी पाणी, चवीपुरते मीठअसं एकत्र करून गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की त्यात काजूचे तुकडे, बेदाणे, केशर, पाव चमचा वेलची पावडर, एका लिंबाचा रस घालावा. आता मंद गॅसवर ठेवून तयार भात नीट मिसळून दहा मिनिटे वाफ काढावी. लागल्यास बाजूने थोडे तूप सोडावे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा