कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

मेथीची गोळा भाजी

साहित्य:
 दोन जुड्या मेथी, अर्धी वाटी तेल, एक वाटी भाजणी थालिपिठाची, एक चमचा लाल तिखट, एक चमचा कांदा लसूण मसाला, दोनतीन कांदे, दहा पंधरा लसूण पाकळ्या, फोडणीचे साहित्य,मीठ.

कृती:
 कांदे बारीक चिरा. लसूण सोला. मेथी निवडून धुऊन चिरा. पाव वाटी तेल कढईत घ्या. मोहरी टाका, तडतडली की कांदा, लसूण घाला, परता. छान परतला की हळद, लाल तिखट, कांदालसूण मसाला घाला. परता. मेथीचा पाला घारा. नीट ढवळून झाकण ठेवा. मंद गॅसवर पाण्याचा हबका मारून मेथी शिजवा. आता मीठ घाला. हवी असेल तर एक चमचा साखर घाला. भाजणी पेरा. मिक्स करा. परत छान वाफ काढा. उरलेल्या तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करा. यात सुक्या मिरच्याही घालू शकता. तयार भाजीला वरून ही फोडणी द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा