कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

फणसाचे उंबर/ घारगे/ पुऱ्या:


साहित्य:

 बरक्या फणसाचे गरे 25/30, दोन वाट्या गूळ, 3 वाट्या तांदूळ पिठी, 2 वाट्या कणिक, 1/2वाटी ओलं खोबरं, 4 चमचे तेल, मीठ, चिमुटभर हळद, तेल.

कृती:
 बरक्या फणसाचे गरे काढून घ्यावे. त्यातील आठीळा काढाव्यात. गरे मिक्सरला फिरवावेत. कढईत दोन वाट्या गर मोजून घ्या, गूळ किसून दोन वाट्या मोजून गरात मिसळावा. हळद, मीठ चवीपुरते घालावे.  खोबरं घालावं.गूळ विरघळेपर्यंत गरम करावे. खाली उतरून त्यात पीठ मिसळावे. गर झाल्यावर मळून छान गोळा करावा. तेल तापत ठेवावे. छोट्या गोळ्या करून
केळीच्या पानावर थापावे. किंवा लाटून घ्यावे. तेलात सोनेरी रंगावर तळावे. चव अहाहा!!! जर गोड कमी हवे असेल तर गूळ कमी घ्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा