कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

बीट खोबरं वडी

बीट खोबरं वडी:
साहित्य: एक मध्यम बीट( पाव कप तुकडे), एक कप ओलं खोबरं, पाऊण कप दूध पावडर, दीड कप साखर, अर्धा टीस्पून वेलची पावडर
कृती: बीट स्वच्छ धुवा आणि शिजवून घ्या. शिजल्यावर गार झालं की साल सोलून बारीक तुकडे करा. नारळ खवून घ्या. खोबरं आणि बीट चे तुकडे शक्यतो पाणी किंवा दूध न घालता वाटा. लागलं तर चमचाभर दूध घाला. आता वाटलेला गोळा कढईत घ्या, त्यात दूध पावडर आणि साखर मिसळा. गॅसवर ठेवून मध्यम गॅसवर गोळा होईपर्यंत ढवळत रहा, घट्ट होऊ लागलं की गाद मंद ठेवा नाहीतर तळाला चिकटेल. ताटाला तूप लावा. गोळा झाला की ताटावर थापून बदाम कापांनी सजवा,
आवडीप्रमाणे वड्या कापा. हे मिश्रण घट्ट असल्याने वड्या पटकन होतात, रंग मस्त येतो.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा