उपासाचा वरी तांदुळाचा शिरा:

साहित्य: एक वाटी वरी तांदूळ, एक वाटी साखर, अर्धी वाटी तूप, दोन वाट्या दूध, दोन वाट्या पाणी, काजूगर 10/ 12, एक केळं, बेदाणे 20/ 25, वेलची पावडर पाव टीस्पून, चिमूटभर मीठ
कृती: वरी तांदूळ थोडे भाजावे, मिक्सरला लावून थांबून थांबून सेकंदभर फिरवावे, रवा व्हायला हवा पीठ नको.
कढईत तयार रवा घ्यावा त्यात तूप घालून तांबूस होईपर्यंत भाजावे. थोडा रंग बदलला की त्यात केळं सोलून त्याचे काप घालावे. काजूगर, बेदाणे घालावे. चिमूटभर मीठ घालावे.दूध, पाणी आणि साखर एकत्र करून उकळावे. उकळलेले मिश्रण भाजलेल्या रव्यात हळूहळू ओतावे. गॅस बारीक असावा नाहीतर मिश्रण हातावर उडू शकते. वेलची पावडर घालून नीट ढवळून झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ द्यावी. रवा शिजलाय ना पहावं, लागली तर अजून वाफ काढावी. टीप: साध्या रव्यापेक्षा छान भाजला असेल तर याला दूध पाणी जास्त लागते, तुम्ही आधी एक भांडं वगळून नंतर लागेल तसं मिसळू शकता. शिरा खाताना कळत पण नाही की वरीचा आहे.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

साहित्य: एक वाटी वरी तांदूळ, एक वाटी साखर, अर्धी वाटी तूप, दोन वाट्या दूध, दोन वाट्या पाणी, काजूगर 10/ 12, एक केळं, बेदाणे 20/ 25, वेलची पावडर पाव टीस्पून, चिमूटभर मीठ
कृती: वरी तांदूळ थोडे भाजावे, मिक्सरला लावून थांबून थांबून सेकंदभर फिरवावे, रवा व्हायला हवा पीठ नको.

✍🏻 मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा