कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

कुळथाचं पिठलं

कुळीथ पिठलं:
पारंपरिक कोकणी प्रकार
साहित्य: अर्धा कप कुळीथ पीठ, साडेतीन कप पाणी, तेल दोन टेबलस्पून, तीन कांदे, पाच सहा लसूण पाकळ्या, पाव टीस्पून मोहोरी, अर्धा टीस्पून हळद, चार पाच आमसुलं, दोन टेबलस्पून ओलं खोबरं, मीठ
कृती: कुळीथ निवडून खमंग भाजून घ्या. गार झाल्यावर भरडून बाहेरची साल पाखडून टाका. कुळथाची डाळ दळून घ्या. अर्धा कप पीठ एक कप पाण्यात एकत्र करून घ्या, गुठळ्या रहायला नको. कांदे सोलून बारीक चिरा. लसूण सोलून घ्या. मिरच्या धुवून तुकडे करा. कढईत तेल तापवा. मोहोरी घाला, ती तडतडली की मिरच्यांचे तुकडे घाला. कांदा, लसूण घालून परता. कांदा आणि लसूण छान परतली की हळद घाला. आता परतून त्यात कालावलेलं पीठ घाला, उरलेलं पाणी घाला. नीट ढवळा. आमसुलं, मीठ, ओलं खोबरं घालून उकळी काढा. चव बघून हवं ते वाढवा. पातळ हवं असेल पाणी वाढवा.
हवं तर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा