कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

कढी:

कढी: पावसात गरमागरम कढी प्यायला मस्त वाटते!

साहित्य:


 एक लिटर ताक, दोन वाट्या ओलं खोबरं, दोन टीस्पून आलं पेस्ट, कढीलिंबाची पानं पाव वाटी, एक टीस्पून

चिंचेचा कोळ, साखर चार टीस्पून, मीठ एक टीस्पून, तूप दोन टीस्पून, ओल्या मिरच्या चार, बेसन दोन टेबलस्पून, हिंग अर्धा टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, पाणी

कृती: ताक स्टीलच्या पातेल्यात काढा. कढीलिंबाची पाच सहा पानं धुवून ताकात घाला. उरलेली पानं आणि मिरची धुवून मिक्सरला फिरवून पेस्ट करा, ताकात मिसळा, ओलं खोबरं पाणी घालून दोनवेळा मिक्सरला फिरवून दूध काढून ताकात मिसळा. आलं धुवून सोलून किसून घाला. मीठ साखर आणि चिंचेचा कोळ घालून नीट ढवळा. थोडं मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यात बेसन नीट कालवून घ्या. ताकात मिक्स करा. छोट्या लोखंडी कढल्यात तूप तापत ठेवा. तयार मिश्रणात वर हळद घाला पण ढवळू नका. तूप तापलं की जिरं, हिंगाची फोडणी करून घ्या. कढीच्या पातेल्यात हळदीवर ही फोडणी ओता. सगळं मिश्रण नीट ढवळून गरम करा, अगदी उकळी नाही तरी बेसन पीठ शिजलं पाहिजे! चव बघून लागेल ते वाढवा. मस्त गरमागरम कढी तयार आहे!
टीप:कढीलिंबाची ( कढीपत्ता) पाने फिरवून घातल्याने सगळ्यांच्या पोटात जातात, नुसती पानं जेवताना काढून टाकली जातात.
आलं पावसाच्या सीझनमध्ये थोडं पुढे छान लागतं.
थोडा चिंचेचा कोळ माझी आजी घालायची, आत्या पण घालते त्याने कढी छान लागते.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा