कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

कुटणीचे मुठीया:

 कुटणीचे मुठीया: 
साहित्य:  कुटणीची पाच पानं, दोन टेबलस्पून जोंधळा पीठ, दोन टीस्पून कणिक, दोन टीस्पून बारीक रवा, एक टीस्पून बेसन, पाव टीस्पून खायचा सोडा, ओवा पाव टीस्पून, मीठ, लाल तिखट एक टीस्पून, हळद पाव टीस्पून, तेल दोन टीस्पून, मोहोरी पाव टीस्पून, हिंग चिमूटभर
कृती: कुटणीची पाने धुवून बारीक चिरावी. सगळी पिठं, रवा, मीठ तिखट, ओवा आणि सोडा एकत्र करावे. लागेल तसं पाणी घेऊन कणिक मळतो तितपत पीठ मळावे. तेलाचा हात घेऊन मुठीया वळावेत. चाळणीत केळीचे पान ठेवून त्यावर मुठीया ठेवावेत. 15 मिनिटं वाफवावेत. गार झाले की तुकडे करून फोडणीत परतावेत.
कुटणी ही रानभाजी आहे त्याऐवजी तुम्ही कोणतीही पालेभाजी घेऊ शकता, एक कप घ्यावी.
✍🏻मीनल सरदेशपांडे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा