कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

काजूची कमळफुले

काजूची कमळफुले:
साहित्य: काजूगर एक कप, साखर अर्धा कप, पाव कप पाणी खाण्याचे रंग हिरवा, लाल

कृती: काजूगर थोडे थोडे तीन वेळा घेऊन थांबून थांबून फिरवावे आणि पावडर करून घ्यावी. 
कढईत साखर आणि पाणी एकत्र करून उकळावे. 
साखर विरघळली की त्यात काजू पावडर मिसळावी. 
दोन मिनिटं परतून घट्ट होत आलं की खाली उतरून गोळा होईपर्यंत घोटावे.  
गोळ्याचे तीन भाग करून घ्यावे. एक भाग पांढरा ठेवावा. एकात दोन थेंब लाल रंग घालून मिक्स करावा. एकात हिरवा रंग दोन थेंब मिक्स करावा.
  तीन रंगाचे  सारखे  छोटे गोळे करून घ्यावे. लाल गोळी तसाच ठेवावी. पांढऱ्या गोळ्याची मोदकाला करतो तशी वाटी करावी, तशीच हिरव्या रंगाची करावी. हिरवी वाटी घेऊन त्यात पांढरी वाटी ठेवावी, त्यात लाल गोळी ठेवून गोल करावा. 
रिळाचा दोरा घेऊन चार भाग करावे.असेच सर्व करून घ्यावे. पाकळ्या अलगद सोडवाव्यात. 
अशीच सगळी कमळं तयार करावी.
✍🏻मीनल सरदेशपांडे









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा