कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

टाकळ्याची गोळा भाजी:

टाकळ्याची गोळा भाजी:

साहित्य: टाकळा चिरून एक वाटी, दोन कांदे, भाजणी दोन टेबलस्पून, कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट एक टीस्पून, मीठ, हळद पाव टीस्पून, तेल दोन टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून

कृती: टाकळा निवडून स्वच्छ धुवा. बारीक चिरा. थोडं पाणी घालून वाफवून घ्या. पाणी काढून पिळून घ्या. कांदे चिरून घ्या. कढईत तेल तापवा. त्यात मोहोरी घाला. ती तडतडली की कांदा घालून परता. मऊ झाला की हळद आणि तिखट घाला. परता. टाकळा घालून परता. त्यावर अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवा. मंद गॅसवर मेथी शिजू द्या. पाच मिनिटांत झाकण काढा. चवीनुसार मीठ घाला. भाजणी पेरून भाजी ढवळा आणि झाकण ठेवून छान वाफ येऊ द्या. गरमागरम भाजी आणि भाकरी म्हणजे अहाहा!!!!

टीप: यात भाजणी ऐवजी बेसन वापरू शकता.
साखर हवी असल्यास घाला.
टाकळा अतिशय पित्तकर आहे, म्हणून पाणी पिळून टाकावे.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा