कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

कुरकुरीत पोळीची बाकरवडी

साहित्य: 10 पोळ्या, दोन टीस्पून चिंच कोळ, दोन टीस्पून गूळ, दीड चमचा लाल तिखट, मीठ, पाव चमचा हळद, तीन वाट्या पाणी, दोन वाट्या बेसन, तळणीसाठी तेल


कृती:  चिंच पाण्यात भिजवून कोळ काढावा. गूळ बारीक चिरून घ्यावा. तीन वाट्या पाणी घ्यावं. त्यात गूळ, मीठ, चिंचेचा कोळ, तिखट, हळद घालावं. चव बघावी. आता बेसन मिसळावे. पीठ पोळीवर पसरून लावता येईल इतपतच सैल करावे.  अर्धी पोळी घेऊन त्यावर  तयार पीठ लावावे.
आता वडी घट्ट गुंडाळून घ्यावी. अशा सर्व पोळ्या गुंडाळून घ्याव्यात.  10 मिनीटं वाफ काढावी. गार कराव्यात. बाकरवडी एवढे तुकडे कापून घ्यावे. तेल गरम करून तेलात छान तळावे. कुरकुरीत पोळीची बाकरवडी तयार आहे!







२ टिप्पण्या: