कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

मुगडाळीची पुरण पोळी

मुगडाळीची पुरण पोळी:
साहित्य: अर्धा कप मुगडाळ, अर्धा कप खवा, एक कप साखर, अर्धा टीस्पून वेलची पावडर, कणिक दोन कप, मीठ, तेल अर्धा कप, तांदूळ पीठ, पाणी
कृती: मुगडाळ स्वच्छ धुवून घ्यावी, दुप्पट पाणी घालून कुकरला वीस मिनिटं शिजवून घ्यावी.  कणकेत मीठ आणि एक टेबलस्पून तेल घालून सैलसर मळावी. उरलेलं तेल पसरट भांड्यात घेऊन त्यात कणिक ठेवावी, झाकून अर्धा तास राहू द्यावी. दहा मिनीटांनी कढईत  डाळ काढून घ्यावी, त्यात साखर मिसळून  मंद गॅसवर पुरण करायला ठेवावे.  पाच मिनिटांनी खवा मिसळावा, वेलची पावडर घालावी. गोळा झाला की गार करत ठेवावे. पुरण गार झालं की लिंबाएवढा गोळा करावा, तेवढीच पिठाचा गोळा घेऊन त्याची वाटी करावी. त्यात पुरण भरून उंडा करावा. पुरण पोळीप्रमाणे तांदूळ पिठीवर लाटावी.
दोन्ही बाजू भाजून घ्याव्यात. गरमागरम पोळी तुपाबरोबर सर्व्ह करावी.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा