कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

मुळ्याचे थालीपीठ

मुळ्याचे थालीपीठ: श्रावण सुरू झाल्यामुळे बऱ्याच जणांना काय करावं रोज असा प्रश्न पडतो.
कांदा लसूण सुद्धा न खाणारे आहेत बरेच! त्यासाठी ही रेसिपी

साहित्य: एक मुळा किसून, थालीपीठ भाजणी चार वाट्या, लाल तिखट एक टीस्पून, मीठ, भरपूर कोथिंबीर, हळद अर्धा टीस्पून, पोहे एक वाटी, तेल एक टेबलस्पून शिवाय थालीपीठ लावताना, पाणी

कृती: मुळा स्वच्छ धुवून घ्या, चिवट असेल तर साल सोलून घ्या. मुळा किसून परातीत घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या.  जाड पोहे धुवून घ्या. परातीत पोहे,  मुळा, कोथिंबीर, तिखट, मीठ चवीनुसार आणि हळद घालून सगळं नीट मिक्स करा. भाजणी घालून मिश्रणाची चव बघा. काही लागलं तर वाढवा. तेल घाला. लागेल तसं पाणी घेऊन पीठ भिजवा. केळीचं पान गॅसवर धरून मऊ करून घ्या. पानाला तेल लावून थालीपीठ थापा. तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजू भाजून घ्या. गरमागरम थालीपीठ लोणी किंवा दह्यासोबत फस्त करा!
टीप: केळीचं पान असेल तर थालीपीठ तव्यावर टाकल्यावर पान सोडवून घेता येतं!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा